बातम्या

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये अनिकेत माने उंच उडी मध्ये द्वितीय.

Aniket Mane came second in high jump in the zonal and interzonal

By nisha patil - 11/19/2025 3:51:48 PM
Share This News:

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या  झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये अनिकेत माने उंच उडी मध्ये द्वितीय.

 कोल्हापूर 19:विवेकानंद महाविद्यालयाचा एम.ए. भाग १ मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु. अनिकेत माने या खेळाडूने उंच उडी खेळ प्रकारात झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये दोन सिल्वर मेडल मिळवले. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामुळे पुढे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी तो पात्र ठरला. यशस्वी खेळाडूचे अभिनंदन. यशस्वी खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. 

तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात, आय. क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व  सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या झोनल व इंटरझोनल मैदानी स्पर्धेमध्ये अनिकेत माने उंच उडी मध्ये द्वितीय.
Total Views: 31