विशेष बातम्या
अनिल लवेकर यांच्या अमृत महोत्सवाची सुरुवात गरजूंना अन्नदानाने
By nisha patil - 6/16/2025 3:34:44 PM
Share This News:
अनिल लवेकर यांच्या अमृत महोत्सवाची सुरुवात गरजूंना अन्नदानाने
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे वर्षभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्रतर्फे अनिल लवेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात १५ जून २०२५ रोजी गरजूंना अन्नदान करून करण्यात आली. लवेकर यांनी ५० वर्षांहून अधिक काळ संघटनेत कार्य केले असून सध्या ते पुणे विभागाचे राज्य संघटक आणि कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत.
महोत्सवी वर्षात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, एचआयव्हीग्रस्त व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमात संघटनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अनिल लवेकर यांच्या अमृत महोत्सवाची सुरुवात गरजूंना अन्नदानाने
|