ताज्या बातम्या

माणसापरीस जनावर बरी... आरदाळ येथील अनोख्या घटनेची चर्चा

Animals are better than humans


By nisha patil - 8/12/2025 12:24:32 PM
Share This News:



आजरा तालुक्यातील आरदाळ गावात एका कुत्रीने शेळीच्या पिलाला दूध पाजून जीवदान दिले, ही घटना ऐकून मन भारावून जाते. शांताबाई यादव यांच्या शेळीला तीन पिल्ले झाली. त्यातील दोन पिल्ले चपळ असल्यामुळे दूध सहज पित होती, परंतु थोडं कमजोर असलेले पिल्लाला दूध मिळत नव्हते.

त्या घरातील पाळीव कुत्रीने हे लक्षात घेतले आणि पिलाजवळ जाऊन उभी राहून दूध पाजण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्या पिलाची आई ही कुत्रीच बनली आणि रोज दूध पाजत आहे.

आजकाल माणसाने माणुसकी कमी केली असली तरी जनावर आपल्या निस्सीम प्रेमाने माणुसकी जपत आहेत, अशी ही घटना जिवंत उदाहरण ठरली आहे. कुत्रीने केलेली ही शिकवण माणसाने नक्कीच लक्षात घ्यायला हवी.

सामाजिक माध्यमांवर ही घटना चर्चेत आली असून लोकांना जनावरातील निस्सीम प्रेम आणि शहाणपण पाहून मन भारावून गेले आहे. या प्रकाराने स्पष्ट होते की माणसकाही शिकण्यासारखी गोष्ट जनावरांकडून मिळू शकते.


माणसापरीस जनावर बरी... आरदाळ येथील अनोख्या घटनेची चर्चा
Total Views: 94