बातम्या

अनिरुद्ध रेडेकर आणि शिवगोंड पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

Aniruddha Redekar and Shivgond Patil met the Guardian Minister


By nisha patil - 9/28/2026 11:10:11 PM
Share This News:



अनिरुद्ध रेडेकर आणि शिवगोंड पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
 

*गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करा

*आजरा(हसन तकीलदार):-नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर झाली आणि गडहिंग्लज तालुक्याला यातून वगळण्यात आले ही माहिती समजताच  जिल्हा परिषद सदस्य  अनिरुद्ध रेडेकर आणि पंचायत समिती सदस्य  शिवगोंड पाटील यांनी तातडीने पालकमंत्री नाम.प्रकाश अबीटकर  यांची राधानगरी तालुक्यातील कोते या ठिकाणी जाऊन भेट घेऊन गडहिंग्लज तालुक्याचाही दुष्काळी भागात समावेश करण्याची मागणी करीत निवेदन दिले.
     

गडहिंग्लज तालुक्याच्या तुलनेने जास्त पाऊस असलेले आजरा आणि चंदगड तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला परंतु समाविष्ट तालुक्यांच्या पेक्षा गडहिंग्लज तालुक्यात पाऊस कमी पडूनसुद्धा गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करावा असे निवेदन पालकमंत्री आबिटकर यांना देण्यात आले आहे.

यावेळी मदत व पुनर्वसन विभागाला सुचना करून तृटींची दुरुस्ती करून गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यासाठी शासन स्तरावरती  सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करण्याचे आश्वासन पालकमंत्री  प्रकाश अबीटकर यांनी जिल्हा परिषद सदस्य  अनिरुद्ध रेडेकर आणि पंचायत समिती सदस्य  शिवगोंड पाटील यांना दिले असल्याचे सांगण्यात आले.


अनिरुद्ध रेडेकर आणि शिवगोंड पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
Total Views: 60