शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयाच्या अनिष सतिश सोनटक्के ची टेबल टेनिस स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी.
By nisha patil - 1/8/2025 4:06:04 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयाच्या अनिष सतिश सोनटक्के ची टेबल टेनिस स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी.
दिनांक: २८ जुलै २०२५ रोजी सांगली येथे घेण्यात आलेल्या दुसरी स्टेट रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर मधील B.Com भाग ३ मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु. अनिष सतिश सोनटक्के याने ओपन सिंगल टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज पर्यंतचा तो पहिला खेळाडू ठरला ज्याने राज्य स्तरावर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली.
खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव मा.प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे,प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. एस. के .धनवडे व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद महाविद्यालयाच्या अनिष सतिश सोनटक्के ची टेबल टेनिस स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी.
|