विशेष बातम्या

अंकली ते चोकाक रस्ता — शेतकऱ्यांचा मोजणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Ankali to Chokak road


By nisha patil - 10/27/2025 2:47:25 PM
Share This News:



अंकली ते चोकाक रस्ता — शेतकऱ्यांचा मोजणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

खासदार माने, आमदार यड्रावकर व अशोकराव माने यांचा सत्कार — पण निर्णय कुठे?

रत्नागिरी–नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक रस्त्याचे चौपट मोबदला देण्याचा निर्णय प्रत्यक्षात लागू न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की “जोपर्यंत चौपट मोबदल्याचा निर्णय अमलात आणला जात नाही, तोपर्यंत कोणतीही मोजणी होणार नाही”.

आज हातकंणगले व शिरोळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मोजणी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले.महसूल विभागाकडून अधिकारी मोजणीसाठी आल्यावर शेतकऱ्यांनी त्यांना थांबवत निषेध नोंदवला.

सहा महिन्यांपूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौपट मोबदल्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या निर्णयाचे स्वागत म्हणून खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अशोकराव माने यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही, म्हणूनच शेतकरी संतप्त झाले आहेत.
“सरकारने आश्वासन दिलं, नेत्यांनी सत्कार करून घेतला; पण आम्हाला मोबदला कधी मिळणार?” असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.


अंकली ते चोकाक रस्ता — शेतकऱ्यांचा मोजणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Total Views: 61