बातम्या

आंदोलन अंकुश संघटनेच्या पाठपुराव्यास यश

Ankush


By nisha patil - 3/15/2026 5:16:30 PM
Share This News:



*आंदोलन अंकुश संघटनेच्या पाठपुराव्यास यश

शिरोळ तालुक्यातून जाणारा राज्य मार्ग 153 सलगरे ते पाचवा मैल रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेला अपघातांना सामोरे जावे लागत होतं. याबाबतीत आंदोलन अंकुश संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज व राजपथ कन्स्ट्रक्शन यांना निवेदन देऊन गेली दोन आठवडे रीतसर पाठपुरावा करण्यात आला होता.

 तसेच मंत्रालय स्तरावर सुद्धा उपसचिव बांधकाम विभाग मुंबई यांना निवेदन देण्यात आले होते. या सर्व गोष्टीची सार्वजनिक बांधकाम व मिरज व राजपथ कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी नोंद घेऊन आज प्रत्यक्षात कामास सुरुवात केली आहे. शिवतीर्थ कुरुंदवाड या ठिकाणी पाहणी करून कामाची खात्री करण्यात आली .

पण कुरुंदवाड येथेच नाही इतर ठिकाणी सुद्धा अपुर्ण असलेली सर्वच कामे पूर्ण होणे गरजेचे अन्यथा निवेदनात सांगितल्याप्रमाणे आंदोलन करावे लागेल असं मनोगत आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी व्यक्त केले . 

यावेळी गोपाळ चव्हाण काका, अशोक पाटील (आप्पा) इत्यादी उपस्थित होते


आंदोलन अंकुश संघटनेच्या पाठपुराव्यास यश
Total Views: 12