बातम्या
अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
By nisha patil - 9/24/2025 11:01:02 PM
Share This News:
अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी किशोर जासूद - कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावात पोलिस पाटील पद रिक्त असून त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर ही पदे भरावीत अशी मागणी आज अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे, जिल्हा अध्यक्ष शशिकांत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष शलमोन लोखंडे, निलेश महापुरे,रोहित सुवासे, दीपक चव्हाण, अमोल धोंगडे, अजय कदम, दिनकर साठे, अमोल बुचडे, शिवाजी वारे, शशिकांत बुचडे, योगेश सकटे, गणेश मोरे, प्रदीप मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
|