बातम्या
श्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93%
By nisha patil - 6/22/2026 12:32:09 PM
Share This News:
श्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93%
पहिल्याच वर्षी Applied Mathematics या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून 2 विध्यार्थीनी उत्तीर्ण
गारगोटी प्रतिनिधी,पाल, ता.भुदरगड येथील श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग डिप्लोमा विभागाचा उन्हाळी परिक्षा 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा निकाल 93.71% लागला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्यामुळे हे यश शक्य झाले आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचेही कौतुक केले. उत्कृष्ट निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
"परिश्रम, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हा निकाल महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे." विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून, भविष्यातही अशाच उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
कॉम्प्युटर विभागातून प्रथम हर्षिता कुरळे (93.41 टक्के), दिव्तीय अर्पिता देवर्डेकर (92.47 टक्के) तर तृतिय वेदीका पाटील (89.53 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत.
एआय-एमएल विभागातून प्रथम वेदिका रेपे (83.53 टक्के), दिव्तीय कल्याणी पाटील (82.24 टक्के) तर तृतिय गौरी साठे (80.94 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत.
इलेक्ट्रीकल विभागातून प्रथम सार्थक पाटील (89.77 टक्के), दिव्तीय आयन नदाफ (76.59 टक्के) तर तृतिय अभिषेक घोरपडे (71.29 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत.
कु.हर्षिता कुरळे व कु.अर्पिता देवर्डेकर यांनी Applied Mathematics परिक्षेत 100 पैकी 100 टक्के गुण प्राप्त विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे.
श्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93%
|