बातम्या
कोल्हापूरमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभार्थी सर्वाधिक; ६ वर्षांत १.५ लाख जणांनी घेतली उद्यमशीलतेची वाट
By nisha patil - 10/16/2025 4:46:42 PM
Share This News:
कोल्हापूरमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभार्थी सर्वाधिक; ६ वर्षांत १.५ लाख जणांनी घेतली उद्यमशीलतेची वाट
राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याचा लाभ घेऊन गेल्या सहा वर्षांत राज्यात १,५२,७७२ जणांनी छोटे उद्योग सुरू केले आहेत. या काळात राज्यात १२,७८१ कोटी २९ लाख ६५ हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे.
कोल्हापूर जिल्हा या योजनेत अव्वल ठरला असून, येथे २०,३२९ जणांनी व्याज परताव्याचा लाभ घेतला आहे. कोल्हापूरमध्ये आतापर्यंत १,८५६ कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले असून, २३६ कोटी रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांना मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, १७,६९९ लाभार्थी आहेत.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांतर्गत मराठा समाजातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी व्यक्ती आणि गटांसाठी वेगवेगळ्या अटींनुसार कर्जावर व्याज परताव्याचा लाभ दिला जातो. वैयक्तिक कर्जासाठी १५ लाख रुपये आणि गटकर्जासाठी ५० लाख रुपये उपलब्ध आहेत.
कोल्हापूरमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभार्थी सर्वाधिक; ६ वर्षांत १.५ लाख जणांनी घेतली उद्यमशीलतेची वाट
|