ताज्या बातम्या
वर्धापनदिन ज्ञानगंगोत्रीचा…!
By nisha patil - 11/19/2025 10:58:13 AM
Share This News:
आपल्या सर्वांच्या ज्ञानगंगोत्री असलेल्या शिवाजी विद्यापीठाचा आज ६३ वा वर्धापन दिन साजरा झाला. या निमित्ताने रात्री नऊच्या सुमारास विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मनोभावे नमन करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत विविध रंगीबेरंगी प्रकाशकिरणांनी उजळून निघाली होती. आकर्षक विद्युत रोषणाईत न्हालेल्या या हेरिटेज इमारतीचे सौंदर्य अधिक खुलून येत होते. संपूर्ण परिसरात साजरी झालेल्या प्रकाशयोजनेने नजरेत साठवून ठेवावी अशी मनोहारी दृश्ये निर्माण झाली होती…!
वर्धापनदिन ज्ञानगंगोत्रीचा…!
|