बातम्या

श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Anniversary of Shri Kadsiddheshwar Spiritual Center celebrated with enthusiasm


By nisha patil - 5/21/2026 11:06:47 AM
Share This News:



श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके - शेंडूर तालुका कागल येथे बुधवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी सात वाजता श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री प. पु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते आरती व प्रवचन झाले. यावेळी स्वामी म्हणाले कोणाची स्तुती करायची असेल तर गुरूंची करावी असे शास्त्रात सांगितले आहे. हे उत्तम उदाहरण देऊन समजून सांगितले स्तुती करायची असेल तर गुरूंची करा व्यवसाय उद्योग ज्यांनी आपल्याला शिकवली त्यांची करा. 


पण एक लोखंडाला सोनं बनवेल पण गुरु शिष्याला बनवतो गुरुच्या पेक्षा कोणी मोठे होऊ शकत नाही.
जरी कोणी पीएसआय मुख्यमंत्री झाले तरी ते गुरूंच्या मुळे शक्य आहे.विचाराचा योग्य प्रामुख्याने गुरु होऊ शकत नाही आचरण पण असावे असलेच पाहिजे.संयम .प्रेम. पुण्याई. ज्ञान. आचरण. याशिवाय गुरु बनू शकत नाही. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हे गुरु बनले. गुरु शिष्याला बनवतो गुरुच्या पेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही. त्यासाठी सेवा करायला पाहिजे. प्रेम करायला शिकले पाहिजे हे गुण असेल तरच गुरु होऊ शकतो. विद्या देत असताना शत्रु मित्र म्हणत नाहीत शत्रु असून दे किंवा मित्र भेदभाव करता येत नाही. आई-वडिलांची आयुष्यभर उपकार फिटत नाहीत तर गुरुचे कशी फेडणार.गुरु राम कृष्ण हे गुरु होऊन गेले. असे प्रतिपादन श्री परम पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. तसेच साळुंखे सर सातारकर यांनी प्रवचनामध्ये सांगितले शेंदूर कराणी मोठ्या प्रमाणावर अध्यात्माची पहिल्यांदाच मला संधी दिली.वाघाला सुद्धा घाबरावे लागेल ही अध्यात्माची ताकद आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे"हे आम्हाला वृक्ष शिकवतात ते आपल्याला शिकण्याची गरज असते वटवृक्ष हा विस्तार करण्याची गरज आपल्याला असते. हरिनाम ही व्याख्या समजून सांगितली. 


या कार्यक्रमाला युवराज तिरुके. शशिकांत कसोटे. अनिल मोरे. गणपती सुतार .कुमार खिरुगडे. विशाल कासोटे. यशवंत सुतार. भीमराव भांडवले .महादेव गुरव. साताप्पा वायकोस. रामचंद्र भांडवले .रुपेश भांडवले. सुनील कांबळे. बाळू देसाई. अरुण खिरुगडे. ई प्रमुख उपस्थिती.तसेच शेंडूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री काडसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र यांच्या वतीनेकार्यक्रमाचे चोख नियोजन करण्यात आले होते.


श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Total Views: 19