राजकीय
स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा — आचारसंहिता तात्काळ लागू!
By nisha patil - 4/11/2025 4:39:43 PM
Share This News:
स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा — आचारसंहिता तात्काळ लागू!
10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल!
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने अखेर नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
या घोषणेसह राज्यात आचारसंहिता तात्काळ लागू झाली असून, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी निवडणूक नियम लागू झाले आहेत.
राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
या निवडणुकीत अनेक ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे रंगू लागली आहेत.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा — आचारसंहिता तात्काळ लागू!
|