बातम्या

हॉलिडेन स्कूल कागल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

Annual get together at Holiday School Kagal


By Administrator - 4/1/2026 6:56:10 PM
Share This News:



हॉलिडेन स्कूल कागल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 
 

प्रतिनिधी -  स्वप्निल गोरंबकर येथील हॉलिडेन इंग्लिश मीडियम स्कूल कागल वार्षिक स्नेहसंमेलन आपला दर्जा कायम राखत मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून करवीर संस्थांच्या सौ. मधुरिमा राजे छत्रपती तसेच उद्घाटक म्हणून कागलच्या नूतन नगराध्यक्षा  सविता प्रताप माने उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेचे ट्रस्टी आदरणीय कोल्हापुरे,  रुबीना कोल्हापुरे, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक सौ. शितल देसाई,  विजय पाटील, सौ. फकरुनिसा मुल्ला तसेच उदय पाटील, ॲड. प्रशांत नवाळे उपस्थित होते. शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
 

दोन्ही पाहुण्यांनी बोलताना शाळेच्या स्नेहसंमेलनाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी विविध बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण 'छावा' हे चित्त थरारक महानाट्य राहिले, ज्याचे कागल परिसरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नफीसा बेपारी, राजनंदा कडोलकर आणि स्मिता नगराळे यांनी केले.


हॉलिडेन स्कूल कागल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 
Total Views: 63