ताज्या बातम्या
कोल्हापूरमधील वार्षिक लोकसंख्या वाढ आणि जनगणना विलंब
By nisha patil - 11/14/2025 12:47:19 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या गेल्या चौदा वर्षांत लक्षणीयरीत्या वाढली असून एकूण सुमारे चार लाख त्र्याहत्तर हजारांनी लोकसंख्येत भर पडली आहे. सध्या जिल्ह्याची अंदाजित लोकसंख्या ४३,४८,९६३ इतकी झाली आहे. वर्षभरात तब्बल २६,३१७ जणांची वाढ झाली असून वाढीचे प्रमाण ०.६१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
देशातील पुढील जनगणना २०११ नंतर अद्याप झालेली नसल्याने अनेक शासकीय कामकाजासाठी जुन्या आकडेवारीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२७ मध्ये नवीन जनगणना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या सूत्रानुसार दरवर्षी एक ते दीड टक्के इतक्या अंदाजित दराने लोकसंख्या वाढ होत असल्याचे मानले जाते.
तालुकानिहाय पाहता करवीर तालुका (कोल्हापूर शहरासह) सर्वाधिक म्हणजे १२,२४,९६५ लोकसंख्येसह प्रथम क्रमांकावर आहे. इतर तालुक्यांमध्येही गेल्या काही वर्षांत सतत वाढ होत असल्याचे निरीक्षणात आले असून या वाढीचा परिणाम जिल्ह्यातील प्रशासन, सुविधा, पायाभूत सेवा आणि विकास योजनांवर होत आहे.
कोल्हापूरमधील वार्षिक लोकसंख्या वाढ आणि जनगणना विलंब
|