बातम्या
नेहरू हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव व बक्षीस समारंभ उत्साहात
By nisha patil - 4/22/2025 8:36:18 PM
Share This News:
नेहरू हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव व बक्षीस समारंभ उत्साहात
कोल्हापूर (प्रतिनिधी) – मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव व बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मा. अय्याज बागवान उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना मा. अय्याज बागवान म्हणाले, "आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात यश मिळवतानाच शिक्षणालाही तितकेच महत्त्व द्यावे. सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत."
या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झालेल्या मा. रहीम खान पठाण व मा. साद मुजावर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन मा. गणी आजरेकर यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थ्यांना एक तरी रोप लावून ते जगवण्याचे आवाहन केले. तसेच, खेळामुळे शारीरिक विकास होतो, मानसिक ताण कमी होतो आणि विद्यार्थ्यांचे कलागुण फुलतात, असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
या कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन मा. रफिक शेख, सदस्य मा. हाजी लियाकत मुजावर, मा. हाजी जहांगीर आतार, मा. रफिक मुल्ला, शाळेचे मुख्याध्यापक श्री. ताशिलदार एम. एम., पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेहरू हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव व बक्षीस समारंभ उत्साहात
|