बातम्या

कागल RTO चेक पोस्ट वरती पुन्हा अपघात; एक जण जखमी

Another accident at the Kagal RTO check post


By nisha patil - 10/30/2026 3:13:32 PM
Share This News:



कागल RTO चेक पोस्ट वरती पुन्हा अपघात; एक जण जखमी

कागल प्रतिनिधी - अजित बोडके कागल : कागल येथील RTO चेक पोस्ट परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

लक्ष्मण दशरथ मगदूम, वय ५०, रा. दर्याचे वडगाव, ता. कागल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास RTO चेक पोस्ट जवळ हा अपघात घडला. या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते आणि अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

या परिसरात वारंवार अपघात घडत असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या चेक पोस्ट परिसरात गतिरोधक बसवावेत, सूचना फलक लावावेत आणि वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे.

जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.


कागल RTO चेक पोस्ट वरती पुन्हा अपघात; एक जण जखमी
Total Views: 22