विशेष बातम्या

अंबप येथे पुन्हा भानामतीचा प्रकार, ग्रामस्थांमध्ये खळबळ..

Another incident of Bhanamati in Ambap


By nisha patil - 11/8/2025 6:01:06 PM
Share This News:



अंबप येथे पुन्हा भानामतीचा प्रकार, ग्रामस्थांमध्ये खळबळ..

भानामतीच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ...

तारा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर जासूद अंबप (ता. हातकणंगले) येथील पाडळी रोडवरील ओढ्याशेजारी भानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

घटनास्थळी काही अज्ञात वस्तू, लिंबू, नारळ, हळद-कुंकू, काळे कपडे अशा साहित्याचा शोध लागला. यामुळे हा प्रकार जादूटोण्याशी संबंधित असल्याची चर्चा गावभर पसरली. गेल्या काही दिवसांत परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 


अंबप येथे पुन्हा भानामतीचा प्रकार, ग्रामस्थांमध्ये खळबळ..
Total Views: 88