ताज्या बातम्या

नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांचा आणखीन एक सामाजिक उपक्रम

Another social initiative by newly elected Zilla Parishad member Aniruddha Redekar


By nisha patil - 2/13/2026 2:06:03 PM
Share This News:



नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांचा आणखीन एक सामाजिक उपक्रम


आजरा(हसन तकीलदार):- गडहिंग्लज तालुक्यातील नुल जिल्हापरिषद मतदार संघातून आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर निवडून आलेले जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अनिरुद्ध रेडेकर यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. शुभेच्छा देताना वह्या आणि पेन देण्याचे आवाहन केले आहे.जनसुराज्य पक्षातून उमेदवारी घेऊन समोरच्या विरोधकांना मात देत नुल जिल्हापरिषद मतदार संघातून रेडेकर यांनी विजायाची पताका फडकवली आहे.
    आपल्या कामाच्या जोरावर आणि मतदार संघाशी जोडलेली नाळ यामुळेच विजयाचे ध्येय साध्य करता आले. कै. केदारी रेडेकर रुग्णालयातून अनेक गोरगरीबांचा इलाज करून देणारे, सर्व सामान्यांच्या हकेला धावून जाणारे त्याचप्रमाणे अनेकविध विधायक कार्यात आपली छाप सोडलेले अनिरुद्ध रेडेकर यांनी आपल्या विजयाची शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या समर्थकांना आवाहन करताना म्हटले आहे की, पुष्पगुछ तर दोन तीन दिवसानंतर कोमेजून जातात परंतु शुभेच्छा देण्यासाठी वह्या आणि पेन आणून दिल्या तर मराठी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना या मोफत वाटता येतील आणि त्यांना शाळा शिकताना थोडी मदत होईल. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी येताना गुच्छ न आणता वह्या आणि पेन आणून द्यावे असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे


Another social initiative by newly elected Zilla Parishad member Aniruddha Redekar
Total Views: 12