बातम्या
महिलांच्या सबलीकरणासाठी आणखी एक पाऊल — संकल्प संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन मलकापूरात
By nisha patil - 10/31/2025 1:05:59 PM
Share This News:
मलकापूर (सुनिल पाटील )-: संकल्प महिला व मजूर बांधकाम कामगार संघटना, मलकापूर यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राजमाता बहुउद्देशीय महिला मजूर सेवाभावी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. ज्योती जनार्दन बच्चे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. दया प्रभावळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. माधुरी अशोकराव देसाई, श्वेता आरळेकर, प्रज्ञा आरळेकर, मीना केसरकर कमल खानविलकर .गिता केसरकर.सुनिता भोसले यांच्यासह अनेक महिला बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील महिला कामगारांचे सबलीकरण, त्यांचे हक्क, सुविधा व सामाजिक सुरक्षा यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
संस्थापक अध्यक्षा सौ. माधुरी देसाई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संघटना कार्यरत राहील.”
महिलांच्या सबलीकरणासाठी आणखी एक पाऊल — संकल्प संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन मलकापूरात
|