बातम्या
कळंब्यातील गॅस स्फोटातील आणखी एक बळी; मृतांची संख्या दोनवर
By nisha patil - 8/30/2025 4:56:43 PM
Share This News:
कळंब्यातील गॅस स्फोटातील आणखी एक बळी; मृतांची संख्या दोनवर
कळंबा येथील मनोरमा कॉलनीतील सोमवारी रात्री झालेल्या गॅस स्फोटात जखमी झालेले आनंद देवाजी भोजने (वय 60) यांचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
गॅस पाइपलाइनमधील गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात शितल भोजने, त्यांचे सासरे अनंत भोजने, मुलगा प्रज्वल आणि साडेतीन वर्षांची मुलगी इलिका गंभीर जखमी झाले होते. यापैकी शितल भोजने यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी आनंद भोजने यांनीही प्राण गमावले.
आनंद भोजने हे स्फोटात सुमारे 70 टक्के भाजले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शुक्रवारी ती अधिक खालावली आणि शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
कळंब्यातील गॅस स्फोटातील आणखी एक बळी; मृतांची संख्या दोनवर
|