बातम्या
शिवाजी विद्यापीठात अंमली पदार्थविरोधी जनजागृती व्याख्यान
By nisha patil - 8/20/2025 6:13:17 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात अंमली पदार्थविरोधी जनजागृती व्याख्यान
कोल्हापूर, दि. 20 : अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान व कोल्हापूर पोलीस दलाचे "मिशन झिरो ड्रग्ज" या उपक्रमाअंतर्गत आज शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विभागात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत पार पडला.
या वेळी पोलीस अधीक्षक मा. श्री. योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. धीरज कुमार बच्चू, तसेच नामांकित न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यातून होणारे सामाजिक व वैयक्तिक नुकसान याबाबत मार्गदर्शन केले. तसेच “युवा पिढी हीच राष्ट्राची ताकद असून नशेमुक्त समाज घडवणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असा संदेश दिला.
या व्याख्यानास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात अंमली पदार्थविरोधी जनजागृती व्याख्यान
|