बातम्या
पंत वालावलकर हायस्कूलच्या अनुष्का रोकडेने मिळवले "चालत चालत" यश
By nisha patil - 10/26/2026 1:50:16 PM
Share This News:
पंत वालावलकर हायस्कूलच्या अनुष्का रोकडेने मिळवले "चालत चालत" यश
कोल्हापूर : येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांतारामपंत वालावलकर हायस्कूलची विद्यार्थिनी अनुष्का कविराज रोकडे हिने शिवाजी विद्यापीठ येथे पार पडलेल्या म.न.पा. जिल्हास्तरीय शासकीय तीन किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक पटकावला . कु. अनुष्का हिला शाळेचे क्रीडाशिक्षक समीर जमादार, राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, सागर वाडकर, उत्तम भोये यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले . शालेय समितीचे चेअरमन संजीव परीख आणि संस्थेचे ज्येष्ठ संचालक एम.एस. पाटोळे यांनी शाळेचे क्रीडाशिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले .
पंत वालावलकर हायस्कूलच्या अनुष्का रोकडेने मिळवले "चालत चालत" यश
|