बातम्या

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक उल्लेखनीय सेवेचा गौरव

Aparna gupta


By nisha patil - 5/5/2026 8:10:57 PM
Share This News:



*महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक उल्लेखनीय सेवेचा गौरव*

मुंबई: दि. ५ मे २०२६ - महावितरणच्या कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्रीमती अपर्णा गिते यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मानाच्या पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे महावितरणसह पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

 

श्रीमती अपर्णा गिते यांनी आपल्या पोलीस कारकिर्दीत अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सार्वजनिक हितासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना या पदकाने गौरवण्यात आले आहे.

 

महावितरणमध्ये कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी वीज चोरी रोखणे, अंमलबजावणी व सुरक्षा यंत्रणेत समन्वय साधणे आणि विभागात शिस्तबद्ध कार्यक्षमता आणण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी व सुरक्षा विभागाने विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. श्रीमती गिते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरण प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

---


महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक उल्लेखनीय सेवेचा गौरव
Total Views: 13