विशेष बातम्या

सरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

Application deadline for direct service


By nisha patil - 6/11/2025 3:46:39 PM
Share This News:



सरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 6 : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेन लिपिक टंकलेखक गट 'क' ही पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने 5 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.

तथापि जास्तीत जास्त उमदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्यासाठी अर्ज भरण्यास 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृहाजवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा.


सरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
Total Views: 40