बातम्या
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मुदत १ सप्टेंबरपर्यंत वाढवली
By nisha patil - 8/29/2025 5:43:23 PM
Share This News:
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मुदत १ सप्टेंबरपर्यंत वाढवली
कोल्हापूर, दि. 29 – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश अध्ययन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट 2025 अखेरपर्यंत मुदत दिली होती, मात्र ती वाढवून आता १ सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली.
या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. आवश्यक कागदपत्रे स्पष्ट व वाचनीय असावीत. यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. मात्र त्यांनी ऑफलाईन अर्जाचा प्रिंट समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे १ सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत सायं. ६.१५ वाजेपर्यंत सादर करावा लागेल, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मुदत १ सप्टेंबरपर्यंत वाढवली
|