विशेष बातम्या

लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावेत

Apply for the Small Entrepreneur District Award before November 30


By nisha patil - 10/27/2025 5:59:11 PM
Share This News:



लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 27 : जिल्ह्यातील लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकांकडून लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उद्योग घटकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्रास 30 नोव्हेंबर पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेसाठी अटी खालील प्रमाणे-          
 

पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षास पात्र लघुउद्योग घटकांना देण्यात येतील. उदा. वैयक्तिक मालकास किंवा फर्मच्या भागिदारास किंवा खासगी मर्यादित कंपनीच्या कोणत्याही संचालकास जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे. तसेच उद्योग घटक संचालनालयाकडे/उद्योग खात्याकडे स्थायीरित्या लघुउद्योग म्हणून नोंदणीकृत झालेला असला पाहिजे.

मागील तीन वर्षात सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे घटक या पुरस्कारास पात्र ठरतील. याकामी विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील 3 वर्षाची वर्षनिहाय माहिती अपेक्षित राहील. उद्योग घटकाची सर्वांगीण प्रगती झालेली असावी. उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. उद्योग घटकास महाराष्ट्र शासनाचा किंवा केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.

पुरस्कार योजनेत यशस्वी उद्योग घटकांना अनुक्रमे 15  हजार व 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र, शाल व श्रीफळ पुरस्काराच्या स्वरुपात दिले जाणार आहे.विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

 


लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावेत
Total Views: 29