बातम्या

विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमदेवारांना नियुक्ती पत्रे

Appointment letters to candidates selected in the state


By Administrator - 2/26/2026 12:29:11 PM
Share This News:



विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमदेवारांना नियुक्ती पत्रे
 

कोल्हापूर, दि.२५ फेब्रुवारी – शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  विद्यापीठ परिसरामधील विविध अधिविभागांमध्ये मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.  मुलाखतीमध्ये निवड झालेल्या १९८६ युवक व युवतीना त्याच दिवशी सायंकाळी मान्यवरांचे हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.  

 

तसचे, ४९३७ एवढ्या युवक व युवतीना मुलाखतीच्या दुसऱ्या फेरीसाठी निवडण्यात आले. त्याचबरोबर, ४६८० एवढ्या  युवक व युवतीचे शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे कागदपत्रे कंपनीच्या प्रतिनिधींनी पुढील कार्यवाहीसाठी जमा करून घेतली. मेळाव्यामध्ये हजारो युवक व युवतीना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. 
 

विविध कंपनीच्या एकूण ९००० जागांसाठी १७८७२ एवढे युवक व युवती उपस्थित राहिले. या रोजगार मेळाव्यामध्ये १३७ कंपन्या सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनान्स, विमा, अकाउंटिंग, आरोग्यसेवा, ऑटोमोबाईल, आयटी, नर्सिंग यांचा समावेश आहे.  दरम्यान, विद्यापीठाचे विविध अधिकारी, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन व विद्यापीठ विकास मंचचे अधिकारी यांनी मुलाखत कक्षास भेट देवून पाहणी केली.
 

नोकरी महामेळावा आयोजनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, प्रशिक्षण अधिकारी शामल पवार, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनचे प्रतिनिधी नितीन माने, नेहा कुंभार यांचे सहकार्य लाभले.  मेळावा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी नेटके नियोजन केले.  याकामी विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, आधिविभागप्रमुख, शिक्षक, प्लेसमेंट अधिकारी, स्वयंसेवक यांनी योगदान दिले.   रोजगार मेळाव्यास विद्यार्थी, विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.


विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमदेवारांना नियुक्ती पत्रे
Total Views: 12