बातम्या

कोल्हापूर राष्ट्रवादीत सुरेश पाटील व सागर भावके यांची नियुक्ती

Appointment of Selectmen Suresh Patil and Sagar Bhavke


By Administrator - 9/4/2026 12:56:29 PM
Share This News:



राष्ट्रवादीत सुरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष, सागर भावके सरचिटणीस

राधानगरीत सुरेश पाटील, सागर भावके यांच्यावर राष्ट्रवादीची जबाबदारी

कोल्हापूर राष्ट्रवादीत सुरेश पाटील व सागर भावके यांची नियुक्ती

शेंडूर प्रतिनिधी - अजित बोडके, : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण)च्या वतीने राधानगरी तालुक्यातील दोन प्रमुख कार्यकर्त्यांवर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, तर सागर भावके यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 

सुरेश पाटील आणि सागर भावके यांनी दीर्घकाळ पक्षनिष्ठा जपत सामाजिक, संघटनात्मक आणि जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षबांधणीसाठी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात आले.
 

या नियुक्त्यांमुळे राधानगरीसह संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार तसेच राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका दोन्ही पदाधिकारी पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच जिल्हा प्रभारी व पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ यांच्या विचारधारेनुसार पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते कार्यरत राहतील, असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल सुरेश पाटील व सागर भावके यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात पक्षवृद्धीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
 


कोल्हापूर राष्ट्रवादीत सुरेश पाटील व सागर भावके यांची नियुक्ती
Total Views: 17