राजकीय

ब्लॅक पँथर पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा व वैभववाडी तालुका अध्यक्षांची नियुक्ती

Appointment of Sindhudurg District and Vaibhavwadi Taluka Presidents of Black Panther Party


By nisha patil - 12/24/2025 12:37:51 PM
Share This News:



सिंधुदुर्ग:- ब्लॅक पँथर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी कुरूळ येथील बौद्धवाडीमधील बौद्ध विहारात बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी संतोष मनोहर साटम यांची तर वैभववाडी तालुका अध्यक्षपदी राजेंद्र केशव पवार यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीचे पत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवाजी पवार, विजय पवार, दिलीप पवार, योगेश पवार, तुकाराम पवार, जितेंद्र पवार, सुधीर पवार, पांडुरंग कांबळे, संजय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


ब्लॅक पँथर पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा व वैभववाडी तालुका अध्यक्षांची नियुक्ती
Total Views: 30