बातम्या

सन २००२ - ०३ च्या कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजिला कृतज्ञता सोहळा 

Appreciation ceremony organized


By nisha patil - 11/16/2026 2:47:58 PM
Share This News:



गुरुजी जमले ; विद्यार्थी रमले 
   

सन २००२ - ०३ च्या कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजिला कृतज्ञता सोहळा 
 

  कोल्हापूर  :  आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूल, सदर बाजार येथील सन २००२ - २००३ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी गेट - टुगेदर कार्यक्रमातून गुरुजींप्रती कृतज्ञता व्यक्त केली . तेवीस वर्षानंतर एकत्र येऊन या बॅचमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी व्यक्त केल्या . या बॅचला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांची प्रवेशद्वारापासून सवाद्य मिरवणूक काढली त्याच बरोबर फुल पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला . यामध्ये सहभागी विद्यार्थी अक्षरशः अवखळ नृत्य करीत शाळेमध्ये दाखल झाले .

सर्वांनी आपल्या अभिव्यक्तीला मोकळी वाट करून देऊन बालपणाचा पुनर्प्रत्यय आणला .या कृतज्ञता सोहळ्यात माजी विद्यार्थी सुस्मित कामत, विकास शिंत्रे, अमर तडाखे, मयूर शिंदे, अभिजीत शिंदे नगरसेवक विशाल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले याबरोबरच शीला कांबळे, भास्कर रेळेकर, जे. जी . पाटील, अशोक शेवडे, राजेश वरक, दिलीप प्रभावळे, बाळाराम लाड, वंदना काशिद, वालावलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, प्रभूप्रसाद रेळेकर, मंहमदअली मुजावर, कमल कांबळे सरिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या . महादेव खामकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळण्यात येत काही फनी गेम्सचेही आयोजन केले होते . कार्यक्रमानंतर सर्व शिक्षकांना आणि सहभागी माजी विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते . हा स्नेह मेळावा म्हणजे कोरगावकर हायस्कूलप्रती असणाऱ्या सुंदर आणि तरल भावनांचा योग्य मिलाफ होता . अनेक विद्यार्थी यावेळी भावनाविवश झाले होते तर काहींनी मुक्त संवाद साधला . यापैकी काही विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन पुन्हा शाळकरी जीवन अनुभवून शिक्षकांच्या छड्या घेतल्या . सर्वांनी उपस्थित शिक्षकांचे टाळ्या वाजवून स्वागत केले . यावेळी सर्व शिक्षकांना शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले .यावेळी माजी विद्यार्थी अश्विनी गावडे, रूपाली कुरणे, सुधा हेगडे, दीपक शिंदे, अविराज कुलदीप, निलोफर कुरणे, परिणीता पोवार, नीलम पैठणकर तसेच विनय पाटगांवकर, आर. डी. पाटील, ललिता मोरे, पल्लवी शिंदे, वत्सला सुर्यवंशी,सागर मनुगडे, बाबासाहेब डोणे, शंकर कामत, भगवान एकशिंगे, शकुंतला कोठावळे, आनंद यादव, अल्का परब आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते .


सन २००२ - ०३ च्या कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजिला कृतज्ञता सोहळा 
Total Views: 18