बातम्या
कोल्हापूर खंडपीठाला मंजुरी सुवर्णक्षण- अँड,रविंद्र तोरसे
By nisha patil - 6/8/2025 4:17:39 PM
Share This News:
कोल्हापूर खंडपीठाला मंजुरी सुवर्णक्षण- अँड,रविंद्र तोरसे
खंडपीठाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळ्यात आनंद उत्सव
पन्हाळा बार असोसिएशनने मानले सरकारचे आभार
पन्हाळा:प्रतिनिधी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कोल्हापूर खंडपीठाला दिलेली मंजुरी सुवर्णक्षण असल्याचे प्रतिपादन अँड,रविंद्र तोरसे यांनी केले.ते पन्हाळा बार असोसिएशन च्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गेले चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर खंडपीठ ला मंजुरी मिळाली.त्या पार्श्वभुमीवर पन्हाळा बार असोसिएशनच्या वतीने पन्हाळा न्यायालय आवारात आनंद उत्सव साजरा करत साखर पेढ्यांचे वाटप केले.
यावेळी अँड,रविंद्र तोरसे यांनी मार्गदर्शन करतान शाहू महाराज संस्थानकाळातील हायकोर्ट सुप्रीम कोर्ट होते. त्याला या सरकारने उजाळा देऊन जनतेच्या मागणीला न्याय दिला आहे. त्यामुळे लोकांचे हेलपाटे आणि आर्थिक खर्च सुलभता झाली आहे.लोकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.१८ तारखेला सुरवात होत, असलेल्या कोल्हापूर खंडपीठाचे दिनांक १६ उद्घाटनाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊ या असे अँड रविंद्र तोरसे यांनी आवाहन केले.मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकाराचे यावेळी पन्हाळा बार असोसिएशनच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी अँड,रविंद्र तोरसे, उपाध्यक्ष अँड, शिवाजी पाटील, सेक्रेटरी अँड, सचिन पाटील, अँड ,विश्वास पाटील, अँड महादेव चावरे, अँड, शरद लुपने, अँड, भाऊसाहेब आंबेकर, अँड. मिलिंद कुराडे, प्रकाश महाजन, नंदकुमार खामकर व पक्षकार नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आणि मा. नामदार भूषण गवई सुप्रिम कोर्ट सरन्यायाधीश व मा.नामदार अलोक आराध्ये मुख्य न्यायाधीश हायकोर्ट मुंबई यांचे सहकार्याने व सर्व जनतेला न्याय मिळाला आहे.
कोल्हापूर खंडपीठाला मंजुरी सुवर्णक्षण- अँड,रविंद्र तोरसे
|