विशेष बातम्या

WhatsApp ला पर्याय – स्वदेशी Arattai ॲप चर्चेत

Arattai app


By nisha patil - 2/10/2025 12:00:57 PM
Share This News:



कोल्हापूर 
WhatsApp वारंवार बंद पडणे आणि वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीबाबत निर्माण झालेल्या शंका यामुळे भारतीय बाजारात एक नवीन पर्याय चर्चेत आला आहे. चेन्नईस्थित Zoho कंपनीने विकसित केलेले Arattai ॲप सध्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. ‘Arattai’ या शब्दाचा तमिळमध्ये अर्थ गप्पा असा होतो.

Arattai ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये
    •    टेक्स्ट चॅट, फाईल शेअरिंग व व्हॉइस नोट्सची सुविधा
    •    व्हॉइस व व्हिडिओ कॉल्स (एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह)
    •    मल्टी-डिव्हाइस सपोर्ट
    •    अ‍ॅड-फ्री अनुभव
    •    लवकरच UPI पेमेंटची सुविधा

फायदे:-  Made in India ॲप असल्याने डेटा पूर्णपणे भारतातच सुरक्षित ठेवला जातो.
 अ‍ॅड-फ्री आणि हलक्या वजनाचे असल्याने ग्रामीण भागातसुद्धा सहज वापरता येते.
स्थानिक भाषांना सपोर्ट.

तोटे

1) WhatsAppच्या तुलनेत युजर बेस अजून कमी आहे.
 2)बिझनेस टूल्स व API सारख्या सुविधा सध्या उपलब्ध नाहीत.
 3)सुरुवातीला एन्क्रिप्शनबाबत काही शंका उपस्थित झाल्या होत्या.

भारतीय वापरकर्त्यांसाठी संधी

      WhatsApp वारंवार बंद पडल्याने अनेक वापरकर्ते त्रस्त झाले आहेत. अशा वेळी Arattai ॲप हा स्वदेशी, सुरक्षित आणि स्थानिक भाषेत उपलब्ध होणारा पर्याय ठरू शकतो. यामध्ये लवकरच UPI पेमेंटची सुविधा येणार असल्याने वापरकर्त्यांना अधिक सोय होणार आहे.

📲 तज्ज्ञांच्या मते, डेटा सुरक्षा, अ‍ॅड-फ्री अनुभव आणि Made in India या वैशिष्ट्यांमुळे Arattai ॲप भारतीय वापरकर्त्यांसाठी WhatsAppचा पर्याय ठरू शकतो.


WhatsApp ला पर्याय – स्वदेशी Arattai ॲप चर्चेत
Total Views: 54