बातम्या

आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*

Arben bank chandgad


By nisha patil - 6/13/2026 4:09:48 PM
Share This News:



**आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*

**आजरा(हसन तकीलदार )*:-ल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी स्टेट) या बँकेच्या चंदगड शाखेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. १३/०६/२०२६ रोजी सकाळी ११.११ वाजता नाम.प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, तथा पालक मंत्री, कोल्हापूर), यांचे शुभहस्ते पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भरमूअण्णा पाटील (माजी मंत्री, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य, मुंबई), शिवाजीराव पाटील (आमदार, चंदगड-गडहिंग्लज आजरा विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई) चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे संचालक, सभासद, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नामदार प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण भागात बँकिंग सेवा विस्तारासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. नवीन इमारतीमुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित व आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि बँकेच्या विकास कामाचा आढावा घेत बँकेच्या कार्याचे कौतुक केले. त्याचबरोबर चंदगड भागातील विकासासाठी आपण सर्वोतोपरी सेवा देण्याचे आश्वासित केले. आम.शिवाजीराव पाटील यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत बँकेची गोवा राज्यात नवीन शाखा सुरू करणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच आजरा बँकेमुळे चंदगड भागातील जनतेला चांगली मदत झाली असलेचे सांगून बँकेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. भरमूअण्णा पाटील यांनी बँकेच्या शाखा विस्तार अधिकाधिक व्हावा, बँकेची प्रगती उतरोत्तर होवो असे गौरव उदगार काढून बँकेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी बँकेचे चेअरमन अशोकअण्णा चराटी म्हणाले कि, आर्थिक सक्षमतेचे आणि व्यवसाय वाढीचे निकष पूर्ण करीत आजरा अर्बन बँकेची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेने १९५७ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. आधुनिक बँकिंग साठी ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सर्व बँकेकडे उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सर्व सवलतीच्या कर्ज योजना बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच येत्या काळात पनवेल (मुंबई) व म्हपसा (गोवा) येथे नवीन शाखा सुरू करणेसाठी प्रयत्न करणार असलेचे सांगितले.

 

उदघाटन प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन संजय चव्हाण, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, आनंदा फडके, श्रीमती शैला टोपले, विजयकुमार पाटील,जयवंत खराडे, डॉ. सुनील देशपांडे, विनय सबनीस, डॉ. सागर कुरुणकर, हृषिकेश सातोसकर, सिद्धेश नाईक, श्रीमती संध्याताई वाटवे, सौ. कुंदा डांग, किरण पाटील, अशोक पाटील, कान्होबा माळवे,ऍड.सचिन इंजल, मनोहर कावेरी, सौ. स्नेहल करंडे, आतिश देसाई तसेच शाखा मार्गदर्शक नारायण काणेकर, संजय भिसे, जयवंत नाडगोंडा, माजी संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी, मान्यवर बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी केले तसेच स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले तर आभार बँकेचे संचालक विजयकुमार पाटील यांनी मानले.


आजरा अर्बन बँकेच्या चंदगड शाखेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*
Total Views: 398