बातम्या
उसने पैशांवरून वाद; पतीकडून पत्नीचा गळा चिरून खून!
By nisha patil - 6/8/2025 4:14:50 PM
Share This News:
उसने पैशांवरून वाद; पतीकडून पत्नीचा गळा चिरून खून!
कळंब्यात खळबळजनक घटना; आरोपी पतीची पोलिसांकडे थेट कबुली
महालक्ष्मी कॉलनी, कळंबा येथे मंगळवारी मध्यरात्री पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. उसने घेतलेल्या व्याजाच्या पैशांवरून झालेल्या वादातून परशुराम पांडुरंग पाटील याने पत्नी अस्मिता हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.
घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे दोन मुले आणि वडीलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उसने पैशांवरून वाद; पतीकडून पत्नीचा गळा चिरून खून!
|