बातम्या
डॉ. आरिफ महात यांना ‘महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान’ पुरस्कार
By nisha patil - 8/26/2025 6:04:45 PM
Share This News:
डॉ. आरिफ महात यांना ‘महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान’ पुरस्कार
कोल्हापूर दि. 26 : येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मधील हिंदी विभागप्रमुख आणि प्रसिध्द् गझलकार प्रा.डॉ.आरिफ महात यांना हिंदुस्थानी प्रचार सभा, मुंबईच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान’ हा पुरस्कार प्राप्त् झाला.
अहिंदी प्रदेशामध्ये हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच अमुल्य काम केलेबद्दल हा पुरस्कार दिला जातो. डॉ. महात यांचे आतापर्यंत एक गझलसंग्रह, तीन कविता संग्रह, दोन अनुवादित ग्रंथ, तीन समीक्षा ग्रंथ, सहा संपादित ग्रंथ प्रकाशित असून त्यांना या पुस्तकांसाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार प्राप्त झालेबद्दल डॉ. महात यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ मा.कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार , महाविद्यालयाच्या IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी अभिनंदन केले.
डॉ. आरिफ महात यांना ‘महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान’ पुरस्कार
|