बातम्या

अर्जुन चषक कॅरम स्पर्धेला दमदार सुरुवात; १२८ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

Arjuna Cup carrom is strong 128 children perform spontaneously


By Administrator - 4/3/2026 6:03:51 PM
Share This News:



अर्जुन चषक कॅरम स्पर्धेला दमदार सुरुवात; १२८ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

 

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील प्रभाग क्रमांक ५ मधील विद्यमान नगरसेवक व माजी उपमहापौर कार्यसम्राट आदरणीय अर्जुन आनंद माने यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चे पाटील क्लब यांच्या वतीने “अर्जुन चषक” कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ताराबाई पार्क येथील बाळकृष्ण हवेली (पाटलांचा वाडा), महावीर गार्डन येथे उत्साहात पार पडत आहे.

स्पर्धेला एकूण १२८ कॅरमपटूंनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यमान नगरसेवक अर्जुन माने, विजय जाधव, डोईफोडे तसेच मोहसीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात राष्ट्रीय सब-ज्युनिअर कॅरम विजेत्या नीधी सप्रे व स्वरा मोहिरे यांचा सत्कार छत्रपती मालोजीराजे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

आज झालेल्या सामन्यांमध्ये अमोल होगाडे, जल्लाल मुल्ला, इक्बाल बागवान, आसिफ सिपाई, अख्तर शेख, ओमकार वडर, टिपू बागवान आणि गौरव हुदले यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

तसेच ‘प्रथम ब्रेक टू फिनिश’ महेश माने, तर ‘ब्लॅक टू फिनिश’ सम्राट लकडे, गौरव हुदले आणि ओमकार वडर यांनी साध्य केले. या खेळाडूंना विष्णू गावडे यांच्या वतीने रोख पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचे नियोजन अख्तर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोहसिन शेख, समीर मुल्ला, अक्षय जाधव, अनिल समुद्रे, नजीर इनामदार, मोहसीन कांडा, बबलू खान, सलीम देसाई आदींनी केले आहे.

विशेष म्हणजे स्पर्धेसाठी सुरको कंपनीचे नवीन १६ कॅरम बोर्ड अख्तर शेख यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ही स्पर्धा कॅरमप्रेमींसाठी एक उत्साहवर्धक पर्व ठरत असून पुढील सामने अधिक रंगतदार होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे


अर्जुन चषक कॅरम स्पर्धेला दमदार सुरुवात; १२८ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
Total Views: 18