शैक्षणिक
पहिल्याच प्रयत्नात यशाची झेप; अर्पिता हावळचा विवेकानंद कॉलेजमध्ये गौरव”
By nisha patil - 4/16/2026 4:57:07 PM
Share This News:
पहिल्याच प्रयत्नात यशाची झेप; अर्पिता हावळचा विवेकानंद कॉलेजमध्ये गौरव”
प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि स्वअभ्यासाच्या जोरावर यश संपादन करता येते, याचा प्रेरणादायी आदर्श अर्पिता सचिन हावळ हिने घालून दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कर सहायक व महसूल सहायक पदासाठी निवड झाल्याबद्दल तिचा येथील विवेकानंद महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांच्या हस्ते झालेल्या या सत्कारप्रसंगी अर्पिताच्या यशाचे कौतुक करण्यात आले. “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेले हे यश केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर महाविद्यालयासाठीही अभिमानास्पद आहे,” असे गौरवोद्गार प्राचार्यांनी काढले.अर्पिताचे प्राथमिक शिक्षण आंबेवाडी येथील विद्यामंदिरमध्ये, तर माध्यमिक शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर विवेकानंद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करताना तिने कोणत्याही खासगी क्लासचा आधार न घेता स्वअभ्यासावर भर दिला. पहिल्याच प्रयत्नात मिळविलेले हे यश तिच्या परिश्रमाचे आणि आत्मविश्वासाचे द्योतक मानले जात आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पहिल्याच प्रयत्नात यशाची झेप; अर्पिता हावळचा विवेकानंद कॉलेजमध्ये गौरव”
|