विशेष बातम्या
पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमीची व्यवस्था
By nisha patil - 4/26/2025 2:59:23 PM
Share This News:
पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमीची व्यवस्था
नगर विकास विभागाने पाळीव कुत्रे व मांजर यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था केली आहे. २५ एप्रिल २०२५ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. मृत प्राण्यांचे योग्य प्रकारे अंत्यविधी न केल्यास दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा धोका असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हार्दिक शुल्क आकारून या अंत्यविधीसाठी परवानगी द्यावी.
पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमीची व्यवस्था
|