बातम्या

यूट्यूबची शिकवण लाखोंच्या बनावट नोटा तिघे अटकेत

Arrested for counterfeit notes


By nisha patil - 8/15/2025 2:19:07 PM
Share This News:



"यूट्यूबची  शिकवण, लाखोंच्या बनावट नोटा; तिघे अटकेत"

कोल्हापूर:- कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत ₹२,४८,२०० किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी यूट्यूबवरून नोटा छपाईची पद्धत शिकून घरीच या नोटा तयार केल्या होत्या.

पोलिस तपासात उघड झाले की, आरोपींनी ₹५०० च्या ३९२ आणि ₹१००च्या २८२ बनावट नोटा छापल्या होत्या. हे पैसे बाजारात फिरवण्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सर्व नोटा जप्त केल्या.

संपूर्ण कारवाईदरम्यान आरोपींचे इतर गुन्हेगारी संबंध, बनावट नोटांसाठी लागणारे साहित्याचा पुरवठादार आणि या रॅकेटमधील इतर सदस्य याबाबत तपास सुरू आहे.


यूट्यूबची शिकवण लाखोंच्या बनावट नोटा तिघे अटकेत
Total Views: 52