बातम्या
*तीस वर्षाची परंपरा असलेला भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे आगमन
By nisha patil - 9/15/2026 9:15:00 PM
Share This News:
*तीस वर्षाची परंपरा असलेला भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे आगमन
*आजरा(हसन तकीलदार):-आजरा येथील भाजी मंडईतील भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे आगमन आज दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता अगदी साध्या पद्धतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात झाले. छत्रपती संभाजी चौकातून मिरवणूक सुरु करून ती भाजी मंडई पर्यंत "गणपती बाप्पा मोरया " च्या गजरात आणली गेली.
स्थापनेपासून म्हणजेच मागील तीस वर्षापासून आनंदा फडके हेच अध्यक्ष पदावर आहेत. मागील तीस वर्षापासून अगदी साध्या पद्धतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात मूर्तिचे आगमन व विसर्जन होते हे या मंडळाचे वैशिष्ठ आहे. आजपर्यँत कोणतेही प्रदूषण न करता डी जे मुक्त आणि प्रदूषण मुक्त विसर्जन मिरवणूक काढली जाते. जो पर्यंत मी अध्यक्ष पदावर आहे तोपर्यंत ही परंपरा कायम टिकवली जाईल असे संस्थापक अध्यक्ष आनंदा फडके यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले. तसेच यावर्षी सोमवारी 21 तारखेला महाप्रसादाचे आयोजन केले असून "गावात घुसला चोर " हा विनोदी हालता देखावा खास आकर्षण असणार आहे अशी माहिती यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
*तीस वर्षाची परंपरा असलेला भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे आगमन
|