बातम्या
“आर्टिफिशियल इंटेलिजन्स: उद्याचे भविष्य!” - प्रा. पंकज फणसे यांचे प्रेरक व्याख्यान
By nisha patil - 4/8/2025 4:31:00 PM
Share This News:
“आर्टिफिशियल इंटेलिजन्स: उद्याचे भविष्य!” - प्रा. पंकज फणसे यांचे प्रेरक व्याख्यान
कोल्हापूर, 2 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे IQAC आणि स्टाफ अकैडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अकॅडेमिक्स अँड एआय’ या विषयावरील विशेष व्याख्यानात जेएनयू विद्यापीठातील संशोधक आणि लेखक प्रा. पंकज फणसे यांनी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हेच उद्याचे भविष्य” असल्याचे ठामपणे सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी AI च्या वाढत्या प्रभावावर आणि त्याच्या सकारात्मक वापरावर जोर दिला.
प्रा. फणसे यांनी सांगितले की, AI चा वापर आज प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. संशोधन क्षेत्रात AI च्या मदतीने चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडत असल्या, तरी त्याचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषत: शिक्षण क्षेत्रात AI चा वापर हा जबाबदारीने आणि सुयोग्य पद्धतीने केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि प्राध्यापकांचे अध्यापन अधिक प्रभावी होईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते. यावेळी प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कविता तिवडे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी, स्टाफ अकैडमी समन्वयक प्रा. अविनाश गायकवाड, स्टाफ सेक्रेटरी डॉ. आर. वाय. पाटील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. AI च्या युगात शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला!
“आर्टिफिशियल इंटेलिजन्स: उद्याचे भविष्य!” - प्रा. पंकज फणसे यांचे प्रेरक व्याख्यान
|