बातम्या

‘शैक्षणिक डिजिटल साक्षरतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची’

Artificial intelligence is important for educational digital literacy


By nisha patil - 11/13/2025 5:35:34 PM
Share This News:



‘शैक्षणिक डिजिटल साक्षरतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची’
 

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त चर्चासत्र
कोल्हापूर, दि. १३ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण  दिनानिमित्त शिक्षण आणि एआय या विषयावर चर्चासत्रासह अभिवाचन, व्हिडिओ रसग्रहणआदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
.

 

भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी  ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन देशभरात साजरा केला जातो. हा दिवस शिक्षणाचे मूल्य आणि प्रगतीशील समाज उभारणीत शिक्षणाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो. चालू वर्षात राष्ट्रीय शिक्षण दिनासाठी  शिक्षण क्षेत्रातील समकालीन आव्हाने आणि आकांक्षांशी सुसंगत असलेली थीम स्वीकारलेली होती. एआय आणि शिक्षण : ऑटोमेशनच्या जगात मानवी एजन्सीचे जतन करणे. अशी ही थीम नवोन्मेष,समावेशकता आणि डिजिटल तयारीवर प्रकाश टाकणारी आहे. 
 

यावेळी शिक्षण आणि एआय या विषयावरील चर्चासत्रात संचालक डॉ. कृष्णा पाटील म्हणाले, एआयच्या वापराने शिक्षक आणि तंत्रज्ञान जवळ आले आहे.याचा फायदा निश्चितपणे शिक्षकांनी करून घेतला पाहिजे.कोणत्याही तंत्राचा, माध्यमाचा वापर हा वापरकर्त्यांना साक्षरतेच्या दृष्टीने  केला पाहिजे. त्यातून आपली मूल्ये जपावी. कौशल्य, ज्ञान, क्षमता वाढविण्यावर भर हवा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नाझिया मुल्लाणी, डॉ. सचिन भोसले, डॉ. सुशांत माने, डॉ. संजय चोपडे, डॉ. केतकी पोवार, प्रियांका सुर्वे आदींनीही मनोगते व्यक्त केली.

 

यावेळी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त विशेष टिपणीचे अभिवचन करण्यात आले. तसेच, बीबीसीवरील एआय व्हिडिओ, एमआयटी डब्लू.पी.यू.चे डॉ. मिलिंद पांडे ,रयत नॉलेज हब वरील डॉ. विवेक सावंत यांच्या शिक्षण आणि एआय वरील व्हिडिओचे रसग्रहण करण्यात आले. या चर्चासत्रास संचालक डॉ.कृष्णा पाटील, उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे, सहा.कुलसचिव श्री.दिलीप मोहाडीकर उपस्थित होते. डॉ. नितीन रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रवीण लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.नगीना माळी यांनी आभार मानले.


‘शैक्षणिक डिजिटल साक्षरतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची’
Total Views: 29