बातम्या
कोल्हापूरमधील सिंगिंग लाईन्स इंस्टिट्यूटच्या वार्षिक चित्रप्रदर्शनात कलाकारांचा जलवा
By nisha patil - 9/23/2025 4:26:16 PM
Share This News:
कोल्हापूरमधील सिंगिंग लाईन्स इंस्टिट्यूटच्या वार्षिक चित्रप्रदर्शनात कलाकारांचा जलवा
कोल्हापूरच्या सिंगिंग लाईन्स डिझाईन इंस्टिट्यूटचे वार्षिक चित्रप्रदर्शन आज हॉटेल सयाजी येथे रंगले. उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार प्रशांत जाधव यांच्या हस्ते, तसेच चित्रकार मनोज सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून NID, NIFT, UCEED, NATA, JEE-२ यांसारख्या परीक्षांसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौशल्य झळकले. प्रदर्शनात पारुल युनिव्हर्सिटी, एलियन्स स्कूल ऑफ डिझाइन, जैन स्कूल ऑफ डिझाईन, ITM, MIT SD यांसारख्या डिझाईन संस्थांचे प्रेझेंटेशन स्टॉलही होते.
कार्यक्रमात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व बेस्ट स्टुडन्ट विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कलाकार प्रशांत जाधव व मनोज सुतार यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासोबत कोल्हापूरच्या अभिजात कलेची माहिती दिली.
इंस्टिट्यूटचे प्रोप्रायटर अन्वर हुसेन, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते
कोल्हापूरमधील सिंगिंग लाईन्स इंस्टिट्यूटच्या वार्षिक चित्रप्रदर्शनात कलाकारांचा जलवा
|