बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत तब्बल २,३८४ नागरिक बेपत्ता; ५४२ जणांचा शोध अद्याप सुरू

As many as 2384 citizens have gone missing in Kolhapur district


By nisha patil - 11/11/2025 11:13:32 AM
Share This News:



कोल्हापूर – जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये तब्बल पोलिसांच्या आकडेवारीनुसार, बेपत्ता झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असून ती १,४१९ इतकी आहे. त्यानंतर ७१३ पुरुष, २०९ अल्पवयीन मुली आणि ४३ अल्पवयीन मुले यांचा समावेश आहे. आतापर्यंत १,१३३ महिला, ४७६ पुरुष, १९२ मुली आणि ४१ मुले यांचा शोध लागला आहे.

बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे पुढे आली आहेत — कौटुंबिक वाद, प्रेमसंबंध, विवाहास विरोध, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव ही प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक प्रकरणांमध्ये युवक-युवती प्रेमसंबंधामुळे घर सोडून जात असल्याचे लक्षात आले आहे.

या वाढत्या घटनांमुळे पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांकडून बेपत्ता प्रकरणांच्या तपासाची गती वाढवावी अशी मागणी होत आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत तब्बल २,३८४ नागरिक बेपत्ता; ५४२ जणांचा शोध अद्याप सुरू
Total Views: 27