बातम्या

*आरदाळमध्ये परंपरेनुसार बहिरीदेव मंदिरामध्ये बहिरीदेवाची विविध रूपात पूजा

As per tradition Bahiredev is worshipped


By nisha patil - 10/14/2026 5:59:26 PM
Share This News:



*आरदाळमध्ये परंपरेनुसार बहिरीदेव मंदिरामध्ये बहिरीदेवाची विविध रूपात पूजा
 

*आजरा(हसन तकीलदार): आरदाळ ता. आजरा येथील बहिरी देव मंदिरामध्ये दरवर्षी परंपरेनुसार बहिरी देवाची वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधली जाते.पहिल्या दोन दिवशी साध्या रूपातील पूजा बांधली गेली.काल दिनांक 13 ऑक्टोबर 2026 रोजी घोड्यावर स्वार रुपातील पूजा बांधली होती.तर आज दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी रथावर स्वार उग्र अवतारी शस्त्रधारी रूपातील पूजा बांधण्यात आली आहे 
     

देवाच्या विविध रूपातील पूजा बांधणीनुसार उद्यापासून पेंढारवाडी गावचा भैरी देव व आरदाळ गावचा भैरी देव या दोन भावांची भेट अशा रूपातील पूजा बांधली जाणार आहे.त्यानंतर देवांचा दरबार भरलेल्या रूपातील पूजा बांधली जाणार आहे तसेच प्रत्येक वर्षी शिलंगण दिवशी पेंढारवाडी गावाजवळ आरदाळचा बहिरी व पेंढारवाडीचा भैरी पालखीतून येतात व भेट होते त्यावेळी दोन्ही गावचे ग्रामस्थ भक्त सोने लुटण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी करतात यावेळी चांगभलं च्या गजरात परिसर दुमदुमून जातो ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा आजही भक्तीभावाने जपली जात आहे.


*आरदाळमध्ये परंपरेनुसार बहिरीदेव मंदिरामध्ये बहिरीदेवाची विविध रूपात पूजा
Total Views: 10