विशेष बातम्या
पावसाने उघडीप दिल्याने नाल्यांच्या सफाईची कामे युध्दपातळीवर सुरु
By nisha patil - 5/28/2025 6:23:26 PM
Share This News:
पावसाने उघडीप दिल्याने नाल्यांच्या सफाईची कामे युध्दपातळीवर सुरु
कोल्हापूर : शहरामध्ये आज सकाळपासून पावसाने उसंती घेतल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने युध्दपातळीवर मोठया नाल्यांची व चॅनलची सफाई करुन गाळ, खरमाती व प्लॅस्टीक कचरा काढण्यात येत आहे. यामध्ये आज ॲस्टर आधार, यल्लमामंदिर जवळील ओढा व देवकर पाणंद परिसरातील नाल्याची पोकलॅन्ड मशिनद्वारे गाळ काढण्यात येत आहे. त्याच बरोबर ॲस्टर आधार व शाम सोसायटी पंप हाऊस जवळील काढलेला गाळ डंपरच्या सहाय्याने उठाव करण्यात येत आहे.
प्रभाग क्षेत्रीय अधिकारी व नगररचना विभागाची नाल्यांवरील अतिक्रमणाची पाहणी
प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उप-शहर रचनाकार व उप-शहर अभियंतांनी आज शहरातील ओढया नाल्यांवरील विना परवाना असलेल्या अतिक्रमणाची समक्ष पाहणी केली. सदरची पाहणी करुन पुढील कारवाई करणेबाबत फिरती करुन पाहणी केली. सदरची पाहणी ॲस्टर आधार, शाम सोसायटी, लाईफस्टाईल सोसायटी, बुध्द गार्डन, हॉकी स्टेडियम या परिसरात करण्यात आली. यावेळी उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, उज्वला शिंदे, संजय सरनाईक, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर,उप-शहर अभियंता महादेव फुलारी, सिनिअर ऑडीटर वर्षा परिट, मुख्य आरोग्यन निरिक्षक डॉ.विजय पाटील यांनी केली.
पावसाने उघडीप दिल्याने नाल्यांच्या सफाईची कामे युध्दपातळीवर सुरु
|