बातम्या
निवडणूक भत्ता न मिळाल्याने आशा स्वयंसेविकांचा काम बंद ठिय्या आंदोलन
By Administrator - 1/21/2026 6:06:36 PM
Share This News:
कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान काम करूनही निवडणूक भत्ता न मिळाल्याने आशा स्वयंसेविकांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करत महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले.
१५ जानेवारी रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेसाठी आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात आली होती. मतदान केंद्रांवर मतदारांना मार्गदर्शन करणे, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना व्हीलचेअरद्वारे मतदान केंद्रापर्यंत नेणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. मात्र निकाल जाहीर होऊनही अद्याप त्यांना निवडणूक कामाचा भत्ता मिळालेला नाही.
या अन्यायाविरोधात मंगळवारपासून आशा स्वयंसेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. भारतीय मजदूर संघटनेच्या माध्यमातून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाची दखल घेत संबंधित उपायुक्तांनी निवडणूक भत्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे.
निवडणूक भत्ता न मिळाल्याने आशा स्वयंसेविकांचा काम बंद ठिय्या आंदोलन
|