बातम्या
कोल्हापूरच्या आश्किन आजरेकर (नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका) आणि राज कोरगावकर यांनी मुंबईतील ‘हायरॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश!
By nisha patil - 9/17/2026 10:53:28 PM
Share This News:
कोल्हापूरच्या आश्किन आजरेकर (नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका) आणि राज कोरगावकर यांनी मुंबईतील ‘हायरॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश!
कोल्हापूर : 17/09 मुंबई येथे नुकत्याच झालेल्या अत्यंत खडतर अशा 'हायरॉक्स' (HYROX) आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या श्री. आश्किन आजरेकर आणि राज कोरगावकर या जिगरबाज खेळाडूंनी ही स्पर्धा विक्रमी १ तास ३४ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत ८ किलोमीटर धावणे (Running) आणि ८ वेगवेगळे कठीण वर्कआउट्स (Workouts) यांचा समावेश होता, ज्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट शारीरिक तंदुरुस्तीचे प्रदर्शन घडवले.
आश्किन गणी आजरेकर यांची क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी:
हायरॉक्स स्पर्धेपूर्वी आश्विन आज़रेकर यांनी जगातील सर्वात कठीण मानली जाणारी 'आयकॉनिक' आयकन मॅन (Ironman) ट्रायथलॉन स्पर्धा, तसेच डुआथॉन्स आणि अनेक मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यांनी या स्पर्ड साठी रगेसडियन जिम मधे सराव केला आहे. ते एक प्रतिभावान राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू असून, महाराष्ट्र फुटबॉल संघाचे त्यांनी ४ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघाचे कर्णधारपद भूषवले असून, १०० वर्षे पूर्ण झालेल्या ऐतिहासिक प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे ते प्रमुख खेळाडू आहेत.
या यशाबद्दल कोल्हापूरच्या क्रीडा वर्तुळातून आणि नागरिकांकडून आश्विन आज़रेकर व राज कोरगावकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोल्हापूरच्या आश्किन आजरेकर (नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका) आणि राज कोरगावकर यांनी मुंबईतील ‘हायरॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश!
|