बातम्या
अशोकअण्णांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज धडाक्यात दाखल
By nisha patil - 11/17/2025 4:56:53 PM
Share This News:
अशोकअण्णांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज धडाक्यात दाखल
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या निवडणूकीचा धुमशान सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या जोडणीत लागला आहे. काहींनी तर हाताला काय तरी लागेल या आशेने फॉर्म भरला असल्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या निवडणूकीत कोण कोणाला मिठी मारेल आणि कोण कोणाचा वचपा काढेल याचं गणित कळणं खूप अवघड आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यत्तीमध्ये अनेकजण असले तरी दोन्ही आघाड्यात जे उमेदवार देतील त्यांचीच खरी फाईट होणार आहे. आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असलेने आजऱ्याचे लाडके नेते, वन मॅन आर्मी अशोकआण्णा चराटी यांनी मोठ्या लव्याजम्यासह अगदी धडाक्यात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रा. अर्जुन आबिटकर (के. डी. सी. सी. बँक संचालक)हे अण्णासोबत उपस्थित होते त्यामुळे नाम. प्रकाश आबिटकर गट आण्णसोबतच राहणार हे नक्की झाले आहे.आज अखेर नगरध्यक्ष पदासाठी 18 तर नगरसेवक पदासाठी 135 नामनिर्देश प्राप्त झाले आहेत
नगरपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख आहे. आजचा शेवटचा दिवस. यासाठी आजरा तालुक्याचे नेते तसेच आण्णभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोआण्णा चराटी यांनी आपल्या समर्थकासह धुमधडाक्यात उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्ताधारी आघाडीतून नगराध्यक्षपदाचे अशोकआण्णा हे उमेदवार म्हणून निश्चित आहेत. विरोधी आघाडीतून संजय भाऊ सावंत काँग्रेस कडून जवळ जवळ निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्य लढत ही अगदी अटतटीची होणार हे निश्चित आहे. त्यात आणखीन कोण कोणत्या नवीन आघाडीतून किंवा अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत यालाही खूप महत्व राहणार आहे.
यावेळी डॉ. अनिल देशपांडे,माजी नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, बाळ केसरकर, जनार्दन टोपले, संजय चव्हाण, राजेंद्र सावंत, विलास नाईक, इकबाल शेख, बशीर काकतिकर, दशरथ अमृते, सिकंदर दरवाजकर,राजाराम पोतनीस, शरीफ खेडेकर, हसन लमतुरे, इसाक शेख, असलम पटेल, अमानुल्ला माणगावकर, रशीद पठाण, दिलावर चांद, इब्राहिम शेख, अकबर मुल्ला, आकाश शिंदे, पिंटू रांगणेकरयांच्यासह अनेक आण्णा भाऊ समूहाचे समर्थ उपस्थित होते.
अशोकअण्णांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज धडाक्यात दाखल
|